⁠ 
[rank_math_breadcrumb]

खुशखबर! जळगावमार्गे धावणार पहिली वंदे भारत स्लीपर; कुठुन कुठपर्यंत धावणार अन् कोणत्या स्थानकांवर थांबणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२५ । देशात वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat) प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस (Vande Bharat sleeper) महाराष्ट्रातही धावणार आहे. नागपूर विभागाने नागपूर-पुणे (Nagpur-Pune) आणि नागपूर-मुंबई (Nagpur-Mumbai) या मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समजते. विशेष म्हणजे स्लीपर वंदे भारत एस्क्प्रेसला भुसावळ, जळगावला थांबा असणार आहे. Vande Bharat sleeper

देशभरात जवळपास १०० पेक्षा जास्त वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या ट्रेनला प्रवाशांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत असून हे पाहता अलीकडेच रेल्वेनं वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. काही दिवसांत पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते लोकार्पण होणार आहे. या स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसचे फोटो रेल्वेमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पहिली वंदे भारत स्लीपर दिल्लीला(Delhi) मिळणार असल्याचे समोर आलेय. महाराष्ट्रामध्ये वंदे भारत स्लीपरचा मान नागपूरला मिळण्याची शक्यता आहे.

नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी प्रस्ताव मांडलाय. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समजतेय. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई यादरम्यान या दोन ट्रेन धावणार आहेत. विशेष म्हणजेच ही ट्रेन भुसावळ आणि जळगाव मार्गे धावणार आहे.

कोण-कोणत्या रेल्वे स्थानकांवर असेल थांबा
नागपूर ते पुणे मार्गावर धावणारी स्लीपर वंदे भारत ट्रेन वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, दौंड या स्टेशनवर थांबण्याची शक्यता आहे.
तर नागपूर ते मुंबई मार्गावर नागपूर, वर्धा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक, कल्याण/ठाणे, दादर, मुंबई याठिकाणी थांबणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.