⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

सोशल मीडिया पोस्टवरून सावदा येथे वाहनांची तोडफोड, ९ जणांविरुद्ध गुन्हा

Savda News । जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । सावदा शहरात दि.२९ रोजी रात्री सुमारे १५० ते २०० लोकांच्या जमावाने दुचाकी आणि चारचाकींची तोडफोड केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर घटना पोलिसांच्या सतर्कतेने तातडीने नियंत्रणात येऊन वातावरण निवळले. दरम्यान, याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा शहरात शहरातील तरुणाने एका समाजातील धर्मगुरू बाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याचे संशयावरून एका समाजाचे लोक संतप्त होवून पोलिस ठाण्याबाहेर जमले व तरुणाविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. पाहता-पाहता मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याने परिस्थिती चिघळत जात असल्याचे पाहून सावदा सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले यांनी जमावाला कारवाईचे आश्वासन देत पांगवल्यानंतर संतप्त जमावाने गांधी चौक, चांदणी चौक आदी भागातील दोन दुचाकीसह एका चारचाकीच्या काचा फोडल्या.

या प्रकाराची माहिती मिळताच सावदा पोलीस स्थानकाचे एपीआय देविदास इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जिल्हा मुख्यालयातून अतिरिक्त कुमक देखील मागविण्यात आली आहे. दरम्यान हा प्रकार सोशल मीडियातील पोस्ट टाकल्याचे संशयावरून संतप्त झालेल्या जमावाने हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, याबाबत सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल यशवंत टहाकळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर सोशल मीडिया पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला आलेल्या जमावास चिथावणी देणाऱ्या तसेच यातील 30 ते 35 जणांना सोबत गावात जाऊन गाड्यांचे नुकसान करून शहरात वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न केल्यावरून 9 जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात तरी 1) सैय्यद असलम सैय्यद लाल 2) शेख साबीर शेख खलील उर्फ अल्लारख्खा, 3) शेख समीर शेख रफीक, 4)शेख वाजीद शेख साबीर, 5)फारुक हाफीज पहेलवान, 6)हसन मुस्तफा वेल्डींगवाला, 7) बबलु खाटीक, 8) शेख सुलतान शेख उस्मान, 9) शेख फरदीन शेख इकबाल तसेच त्यांचे सोबत अंदाजे 30 ते 35 लोक यांनी दि. 29/10/2022 रोजी रात्री 20.00 वाजेचे सुमारास सावदा शहरातील राहणारे इसमाने मुस्लीम समाजाचे धर्मगुरु यांचे संदर्भात मोबाईलवर काहीतरी आक्षेपार्ह पोस्ट केलेली असल्याचे संशयावरुन मुस्लीम धर्माचे अंदाजे 150 ते 200 लोक घडलेला प्रकाराची पोलीस स्टेशन येथे माहीती देणे करीता एकत्रीत आले असता दि.29/10/2022 रोजी 21.45 वाजेचे सुमारास त्यांचे पैकी इमस नामे सैय्यद असलम सैय्यद लाल याने त्याचे आजु बाजुला असलेले जमावातील लोकांना चिथावणी देवुन “चलो रे यहा से, हम भी देख लेंगे “असे बोलुन दंगा घडवून आणणे करीता बेछुटपणे चिथावणी दिल्याने जमावातील लोकांच्या भावना भडकल्याने वरील नमुद इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन एकत्रीत होवुन रात्री 22.40 वाजेचे सुमारास पोलीस स्टेशन स्टेशन मधुन निघुन सावदा शहरातुन आरडाओरड करीत असतांना वरील नमुद वाहनांची तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे.

माझी त्यांचे विरुद्ध भादवि कलम 153,143, 147, 149, 337 सह पब्लीक प्रॉपर्टी अँक्ट कलम-3, सह महा. पोलीस अधिनीयम 1959 चे कलम 37 (1) (3) / 135, 112,117 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्ती विरोधात रात्री उशिरापर्यंत कार्यवाही करण्याचे काम सुरू होते.

नुकसान झालेली वाहने – 1) पांढरे रंगांची इंडीगो कार क्र.MH.19.AX.7282 हिचा समोरील काच, 2) सिलव्हर रंगांची सॅन्ट्रोकार क्र. MH.02.BG.2177 हिचा समोरचा व उजवे बाजुचा समोरील काच, 3)पांढरे रंगाची मारोती 800 कार क्र.MH.15.F.7253 हिचा उजवे बाजुचा मागील काच, 4)पांढरे रंगांची मारोती ओमीनी कार क्र.MH.19.BJ.0691 हिचे डावे बाजुचा पुढील दरवाजा वाकवला, 5) लाल रंगांची बजाज सीटी मोसा क्र.MH.19.CH.6983 हिचे समोरील चाक वाकवले व इंडीकेटर तोडुन नुकसान, 6)पांढरे रंगांची टाटा इंडीगो कार क्र.MH.19.AE.4446 हिचे उजवेबाजुचा पुढील दरवाजा वाकवुन साईड मिरर तोडफोड करुन नुकसान केलेले आहे.