वनविभाग जळगाव अंतर्गत भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ( ई-मेल) \ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५ आहे. Van Vibhag Jalgaon Recruitment 2025

ही भरती “मानद वन्यजीव रक्षकांची” पदांसाठी होत आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑनलाईन ( ई-मेल) \ ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता- उपवनसंरक्षक, जळगाव वनविभाग जळगाव, प्रशासकीय इमारत टप्पा क्र.3 तळ मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव.
ई- मेल पत्ता – dcfjalgaon@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० एप्रिल २०२५
अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
अटी व शर्ती
१. उमेदवारास वन्यजीव संवर्धनाची खरी काळजी असणे आवश्यक आहे.
२. निसर्गाच्या आणि वन्यजीव संवर्धनाच्या हिताला हानी पोहोचवणा-या कोणत्याही अपराधी कृत्यात सहभागी नसलेला व्यक्ती.
३. वन्यजीवांच्या व्यावसायिक शोषणात सहभागी असलेला कोणत्याही व्यक्तीचा विचार केला जाणार नाही.
४. वन व वन्यजीव विभागाचे यंत्रणेला मदत करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
५. स्थानिक समुदायाशी संवाद साधुन त्यांना वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यात सक्षम असणारी व्यक्ती.