जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा येथे माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराला रुग्णाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यात सुमारे ५२५ रुग्णांनी लाभ घेतला.
गुरबराव देवकर मल्टी स्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे शिबिरआयोजित करण्यात आले होते. यावेळी ऍड. रोहिणीताई खडसे यांनी शिबिरात आढळून आलेल्या रुग्णांवर देवकर रुग्णालयात ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार केले जातील, असा शब्द रुग्णालयाचे संचालक व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिल्याचे सांगतिले. यामुळे शासकीय योजनांमध्ये न बसणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. रुग्णालयाचे जनरल सर्जन डॉ. रोहन पाटील यांनी आता कोणत्याही अवघडाने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी आपल्याला मुंबई पुण्याला जायची गरज नाही. त्या सर्व शस्त्रक्रिया देवकर रुग्णालयात होत असून या ठिकाणी सर्व अद्यावत सुविधा व तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असल्याने सांगितले.
शिबिराचे उद्घाटन रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माणिकराव पाटील, निवृत्ती पाटील, दशरथ कांडेलकर, डॉ बी सी महाजन, विशाल महाराज खोले, रवींद्र दांडगे, शिवा पाटील, पुरुषोत्तम पाटील, पुंडलिक कपले, रणजीत गोयनका, प्रविण कांडेलकर, तायडे सर, विशाल रोठे, उद्धव महाजन, डॉ. विष्णू रोठे, मनोहर निंबाळकर, वंदनाताई,भास्करराव पाटील, मदनलाल टावरी, अहमद शेठ, शालीग्राम भगत,नितिन भगत, शरीफ खान, गणेश पाटील, उद्धव महाजन, गणेश तायडे, रशीद मेंबर, मधुकर अजाबराव पाटील, मधुकर सीताराम पाटील, राजू कुटे, उमेश बोबटकार, जोतिराम हटकर,अंबादास देवकुंडे, आशिष हिरोळे पाटील , शुभम खंडेलवाल , मयुरकुमार साठे, निवृत्त वनाधिकारी अशोक पाटील, देवकर रुग्णालयाचे डॉ. प्रशांत साठे, डॉ. दीपक पाटील,डॉ. श्रीकांत पुरी, डॉ. नीरज चौधरी, डॉ.रोहन पाटील, डॉ. वृषाली पाटील , डॉ.अतुल सोनार, डॉ.अश्विनी चव्हाण, डॉ. प्रियंका चौधरी,डॉ.प्रियंका देवरे , डॉ.अमित नेमाडे, डॉ.अनंता पाटील, डॉ. नितीन पाटील आदी उपस्थित होते.