⁠ 
शनिवार, मे 18, 2024

मारवडला ‘लंपी’ रोगाचे लसीकरण, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । लायन्स क्लब अमळनेर व मारवड वि.का.सो.च्या संयुक्त विद्यमाने मारवड येथे जनावरांच्या लंपी या संसर्गजन्य आजाराच्या लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात सुमारे ५०० जनावरांना लसीकरण करण्यात आले.

अमळनेर तालुक्यातील मारवड,गोवर्धन व बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश होता. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ.मुकेश पाटील,सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ.बी.एस.पाटील,पशुधन पर्यवेक्षक भूषण जोशी,परिचर राहुल बाविस्कर,नाजीम शेख यांनी लसिकरणासाठी सहकार्य केले. तालुक्यातील जनावरांमध्ये लंपी आजाराचा संसर्ग कमी व्हावा यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

यावेळी लायन्स चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे, सेक्रेटरी महावीर पहाडे, ट्रेझरर अनिल रायसोनी,झोन चेअरमन नीरज अग्रवाल, एमजेएफ विनोद अग्रवाल पंकज मुंदडे,जितू गोहील, राजू नांडा डॉ. मिलिंद नवसारीकर, दिलीप गांधी प्रसन्ना जैन,प्रदीप अग्रवाल,प्रीतम मणियार,येझदी भरुचा,प्रदीप भाऊ जैन तसेच मारवड वि.का.सो.चेअरमन राकेश मुंदडे,व्हा.चेअरमन गुलाब पाटील,सचिव सुनील पाटील,संचालक शरद पाटील,गुलाब पाटील,उमाकांत पाटील,अनिल पाटील,अनिल साहेबराव पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.