⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 4, 2024
Home | गुन्हे | अमळनेर तालुक्यात होळीच्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना

अमळनेर तालुक्यात होळीच्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२४ । अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. होळीच्याच दिवशी घराला आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घरातील कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला. दिलीप नामदेव पाटील असे मयताचे नाव आहे.

याबाबत असे की, अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे कुटुंबासह वास्तव्यास असलेले दिलीप पाटील त्यांच्या पत्नी सायंकाळी दिवा लावत असतानाच घरात अचानक आग लागली आणि त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घराचे लाकडी छत आणि घरात कापूस असल्याने सर्व घरातच आग पसरली. दिलीप यांच्या पत्नी, मुलगा आणि नात तातडीने घराबाहेर पळाले.

मात्र दिलीप यांना चक्कर आल्याने ते घरात अड कून पडले. ग्रामस्थ मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. घर आणि घरात असलेल्या किराणा दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. आगीत पाटील यांच्या पत्नी संगीता, मुलगा विकी व नात खुशी हे देखील जखमी झाले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.