⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार जळगाव जिल्ह्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोदरी गावामध्ये २५ ते ३० जानेवारी २०२२ दरम्यान अखिल भारतीय गोर बंजारा लबाना व नायकाडा समाजाचा महाकुंभ भरवण्यात येणार आहे. या कुंभाची सर्व व्यवस्था व तयारी अंतिम टप्प्यात आली असून संपूर्ण सामाजिक व प्रशासकीय यंत्रणा यासाठी तयारीला लागली आहे. ३० जानेवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील या कुंभला येणार आहेत. (yogi adityanath in jalgaon)

एकूण पाचशे एकर क्षेत्रात या कुंभाची जय्यत तयारी सुरू झाली असून दहा लाख भाविक येतील असा अंदाज वर्तवला जात आहे. याचबरोबर पन्नास हजार भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. सहा दिवसीय कुंभासाठी देशभरातून विविध राष्ट्रीय संत राजकीय नेते मंत्री तसेच विविध विशेष मंडळी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. यांसाठी चार हेलीपॅड ची उभारणी या ठिकाणी करण्यात आली आहे.

या महा कुंभाची गर्दी लक्षात घेता या ठिकाणी 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय अग्निशमन दल रुग्णवाहिका रुग्णालय अशा व्यवस्था ही या ठिकाणी करण्यात येणार आहेत. मोबाईल कनेक्टिव्हिटी साठी बीएसएनएल तर्फे तात्पुरता स्वरूपाचे मोबाईल टॉवर या ठिकाणी उभारण्यात आले आहेत याचबरोबर या ठिकाणी नागरिकांसाठी जेवणाची देखील सोय करण्यात आली आहे. (yogi adityanath in godri)

हिंदू धर्मातून बंजारा समाज हा विखुरला जात आहे. तो विखुरला जाऊ नये आणि संपूर्ण समाज एकत्रित व्हावा यासाठी या महा कुंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्याम चैतन्य महाराज यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्याचबरोबर ते असेही म्हणाले की 30 तारखेला म्हणजेच 30 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील या कुंभला येणार आहेत. त्यांची विशेष हजेरी या कुंभला असणार आहे.