फक्त आयफोनच वापरा! उद्धव ठाकरेंचे नेते-पदाधिकाऱ्यांना सूचना…

फेब्रुवारी 2, 2023 3:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२३ । उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आले असून उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या या सूचनांमुळे ठाकरे गटाचा फक्त आयफोनवरच विश्वास उरला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

udhav thakre 1 jpg webp

पक्षातील प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे अशा सूचना मी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांना दिल्या असल्याचे दानवे म्हणाले. याबाबत पक्षाकडून अधिकृत सूचना नाही. मात्र जबाबदार लोकांनी जबाबदारीने राहिले पाहिजे आणि बोलले पाहिजे. अनेकदा बोलताना चुकून चार चौघात एखादा शब्द निघून जातो. त्यामुळे रेकॉर्डिंग होते आणि त्याचा मोठा विषय बनवला जातो. अशातच काळजी घेतली पाहिजे, असेही दानवे म्हणाले. 

म्हणून आयफोन वापराच्या दिल्या सूचना ?
राज्यात भाजप-शिवसेनेचं (BJP-Shiv Sena) सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणानंतर सावध भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील मुख्य पदाधिकारी, नेते, उपनेते, आमदार, खासदारांच्या पीएसह सर्व स्टाफना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now