जळगाव लाईव्ह न्यूज । नवीन वर्षाच्या आगमनासोबतच अनेक नियम बदलणार आहेत. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI 123 Pay च्या ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये केलेला बदल. 1 जानेवारीपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI 123 Pay च्या ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता UPI 123 Pay वापरणारे युजर्स 5000 रुपयांएवजी 10,000 रुपयांचे ट्रान्झॅक्शन करु शकणार आहेत. हा नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
UPI 123Pay काय आहे?
UPI 123Pay ही अशी सर्व्हिस आहे ज्यात युजर्स विना इंटरनेटदेखील पेमेंट करु शकतात. ही सुविधा फीचर फोन वापरणारे आणि सीमित इंटरनेट कनेक्टिविटी असलेल्या युजर्ससाठी खूप उपयुक्त आहे. या सिस्टमद्वारे युजर्स 4 पद्धतीने ट्रान्झॅक्शन करु शकतात: IVR नंबर, मिस्ड कॉल, OEM एम्बेडेड अॅप आणि साउंट बेस्ड टेक्नोलॉजी.
कसे काम करेल?
युजर्स IVR नंबरद्वारे पेमेंट करु शकतील. यासाठी तुम्हाला (०८०-४५१६३६६६६, ०८०४५१६३८१, ६३६६२००२००) या नंबरवर कॉल करुन यूपीआय आयडी वेरिफाय करुन पेमेंट करावे लागेल. या सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी युजर्सच्या पेमेंटसाठी OTP ची आवश्यकता असेल, ज्यामुळे पेमेंटची सुरक्षा वाढेल.
परिणाम आणि भविष्य
1 जानेवारी 2025 पासून लागू होणारा हा नवीन नियम डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे नागरिकांना अधिक सुलभ आणि सुरक्षित पेमेंट विकल्प मिळणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाने डिजिटल भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.