रावेरातील रेल्वे अपघातात यूपीतील प्रौढाचा मृत्यू

ऑक्टोबर 25, 2025 2:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर येथील रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी राजेंद्र कुमार निकम (क्य. ५० वर्षे) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

image 55 jpg webp

मुंबई-कानपूर एक्सप्रेस रावेर स्थानकातून सुटत असताना राजेंद्रकुमार निकम हे झोपेतून उठून बाथरूमकडे जात होते. त्या वेळी त्यांचा अचानक तोल गेला. त्यामुळे ते रेल्वेतून खाली पडले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या विषयीची माहिती मिळाल्यावर रावेर येथील समाजसेवक रवी पाटील व मित्र परिवाराने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी मृतदेह स्मशानभूमीत नेत अंत्यसंस्कार केले. मृत निकम यांच्यासोबत त्यांचे नातेवाइक नितीन कुमार निकम, मंटु निकम, अनिकेत निकम, अनुज निकम होते. या वेळी प्रमोद रामदास महाजन, सुनील दिलीप कोळी, योगेश कमलाकर महाजन, सनी रामकृष्ण महाजन, विशाल गणेश पाटील, चेतन सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now