विद्यापीठामधील वाहने कुणाच्या परवानगीने प्रचारासाठी वापरली जात आहेत – अॅड. कुणाल पवार
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे, त्यासाठी नियमावली देखील निर्माण झाली आहे. परंतु, त्याची उघडपणे पायमल्ली काही माजी ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्य करत आहेत. म्हणजे, मागील सिनेट सदस्य, राज्यपाल महोदय नियुक्त व्यवस्थापन सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तरीही विद्यापीठाच्या हक्काची गाडीचा वापर काही सिनेट सदस्य व राज्यपाल महोदय नियुक्त सदस्य करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. कुणाल पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, रावेर लोकसभा अध्यक्ष गौरव वाणी, प्रदेश सचिव रोहन सोनावणे गणेश निंबाळकर चंदन कोळी बंटी पाटील यांनी केला आहे.
मोलगी येथे विद्यापीठाची गाडी घेऊन कोणते दोन माजी व्यवस्थापन परिषद सदस्य का गेले ? विद्यापीठाने त्यांना गाडी घेऊन जायची परवानगी कशी काय दिली? कोणाच्या आदेशाने सदर वाहन त्यांना दिले गेले ? सदर वाहनातून त्यांनी कोणाचा प्रचार प्रसार केला ? मुळात वर्तमान पत्रातून जाहीर करून पडद्या मागे कुटील राजकारण करून कोणता आर्थिक व राजकीय फायदा घेण्याचा किवा कोणाला म्हंजे कोणत्या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाला दबाव दाखावण्याचा प्रयत्न सदर मंडळी करत आहे कारण जेव्हा जेव्हा कुलगुरू विद्यापीठात नसतात तेव्हाच त्यांना विद्यापीठाची वाहने कशी भेटतात ? त्यांचा डिझेल चां खर्च कोणी केला त्यांची बिले कोणाच्या नावावर टाकली गेली अशी बरीच प्रश्नाची उत्तरे आम्हाला भेटत नाही म्हणून आपणास कळकळीची विनंती की काही मंडळी आपल्या नावाखाली षडयंत्र रचून काही तरी चुकीच्या मार्गाने फायदा घेवू पाहत आहे . असे बरेच प्रश्न आमच्या सह सारे विद्यार्थी संघटनांना पडलाय ?
त्यामुळे आमची सर्वांच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे की राज्यपाल महोदय यांनी नियुक्त केलेल्या व्यवस्थापन परिषद सदस्यांना विद्यापीठात कायम स्वरुपी घर बांधून द्यावे एक गाडी घेऊन द्यावी त्यांना नोकर चाकर उपलब्ध करून द्यावे व त्यांचा येणारा खर्च विद्यापीठाचा विकास निधी ह्यातून करावा अन्यथा आम्हास प्रत्येक महाविद्यालयात जावून मदत पेटी त्यांच्या साठी लावण्याची परवानगी द्यावी व त्यातून येणार पैसा त्यांना अदा करण्यात यावा कारण आता त्यांचं फक्त एवढंच बाकी राहिलंय अस वाटते असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष ऍड कुणाल पवार,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे रावेर लोकसभा अध्यक्ष गौरव वाणी प्रदेश सचिव रोहन सोनावणे गणेश निंबाळकर चंदन कोळी बंटी पाटील यांनी केला आहे