जळगावातील ४५ वर्षीय व्यक्तीने रेल्वेखाली घेतली उडी

फेब्रुवारी 17, 2022 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२। जळगावातील एका ४५ वर्षीय व्यक्तीने धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. रमेश राजन्ना लोंकलकर (वय ४५,रा.शिवाजी नगर) असे मयताचे नाव असून याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime jpg webp

काय आहे घटना?
रमेश लोंकलकर हे बळीराम पेठेतील वैभव रेडीमेड कापड दुकानात काम करीत होते. आज शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. दरम्यान दुपारी जळगाव शिरसोली रेल्वे मार्गावर मोहाडी गावानजीक शिरसोली रेल्वे डाऊन मार्गावर खांब क्र.४११ (५-७) त्यांचा मृतदेह आढळून आला.

एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची रेल्वे प्रबंधकांकडून खबर मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी हवालदार अनिल फेगडे व हरीलाल पाटील यांना घटनास्थळी रवाना केले. खिशात आढळलेल्या कागदपत्रावर मुलाचा मोबाईल क्रमांक असल्याने मृताची ओळख पटली. पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला. लोंकलकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now