⁠ 
सोमवार, मे 6, 2024

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : एफएमसीजी कंपन्यांना काय आहे अपेक्षा?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ मध्ये कोणकोणत्या घोषणा केल्या जातात, याकडे सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे. वाढती महागाई आणि ग्रामीण भागात मंदावलेली मागणी यांच्याशी झगडत असणारी फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपन्या वस्तूंची मागणी वाढण्यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, यासाठी आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी करत आहेत.

हे देखील वाचा : केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : आता मोबाइलवर वाचता येणार देशाचं बजेट

कोरोना महामारीचा विविध क्षेत्रांना फटका बसला असून, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर सुद्धा झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मोबदला वाढवणं, पगारदारांसाठी टॅक्स कमी करणं यासारख्या अनेक घोषणा अर्थसंकल्पात केल्या जातील, व ज्यामुळे व्यवसायाला मदत होईल, अशी अपेक्षा हिंदुस्थान युनिलिव्हर, पार्ले प्रॉडक्ट्स, इमामी आणि केविन केअर सारख्या कंपन्यांच्या उच्च अधिकार्‍यांना आहे. 

हे देखील वाचा