⁠ 
शनिवार, मे 18, 2024

प्रतीक्षा संपणार! बजाजची CNG बाईक पुढील महिन्यात लाँच होणार, किती मायलेज देईल??

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२४ । पेट्रोलच्या वाढत्या किमती पाहता अनेक लोक CNG बाईकची आतुरतेने वाट पाहत असून याच दरम्यान बजाज ऑटो लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 18 जून रोजी जगातील पहिली बजाजची CNG मोटारसायकल भारतात लाँच करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मात्र ही बाईक कशी असेल? किती मायलेज देईल आणि यात कोणते फीचर्स मिळणार, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

मायलेजसह स्टायलिश लूक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही बाईक 100 ते 125 सीसी इंजिन पर्यायांमध्ये सादर करेल. यात डिस्क ब्रेक आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम यांसारख्या अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स दिले जाऊ शकतात. मात्र कंपनीने या बाईकची किंमत आणि इतर तपशील अद्याप जाहीर केलेला नाही.

ही बाईक 1 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध होऊ शकते. यात दोन ते पाच किलो गॅस क्षमतेचे सिलिंडर मिळू शकतात. ही बाईक 80 ते 90 किलोमीटर प्रति किलो मायलेज देईल.

बजाज सीएनजी बाईक अनेकवेळा टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली आहे. या बाईकमध्ये फ्युएल टँकवर ग्राफिक्स असतील. ही बाईक टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मोनोशॉक सस्पेन्शन पॉवरसह येईल. बाईकमध्ये एलईडी लाईट मिळू शकतात. बाईकला मोठ्या हेडलाइटसह मोठी सीट मिळेल.