⁠ 
शनिवार, मे 18, 2024

एअर इंडियाकडून ‘फ्री बॅगेज पॉलिसी’त मोठा बदल ; आता विमानात ‘इतक्या’ किलोपर्यंत सामान नेण्याची परवानगी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२४ । जर तुम्ही एअर इंडियाने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. टाटा समूहाच्या मालकीची भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने फ्री बॅगेज पॉलिसीमध्ये बदल केला आहे. तोट्यात असलेल्या एअर इंडियाने देशांतर्गत उड्डाणांमध्ये सर्वात कमी भाड्याच्या श्रेणीतील प्रवाशासाठी केबिन बॅगेजचे किमान वजन 20 किलोवरून 15 किलोपर्यंत कमी केले आहे.

एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, भाडे मॉडेलमध्ये तीन श्रेणी आहेत – कम्फर्ट, कम्फर्ट प्लस आणि फ्लेक्स. ते वेगवेगळ्या किंमतींवर विविध सुविधा देतात. कम्फर्ट आणि कम्फर्ट प्लस श्रेणींमध्ये मोफत केबिन बॅगेज सुविधा 2 मे पासून 20 किलोवरून 15 किलो आणि 25 किलोपर्यंत कमी करण्यात आली आहे.

आतापर्यंत 25 किलोला परवानगी
सध्याच्या भाडे मॉडेलच्या आधी, एअर इंडियाच्या देशांतर्गत फ्लाइटमधील प्रवाशांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 25 किलो केबिन सामान नेण्याची परवानगी होती. मात्र यात आता बदल करण्यात आला आहे.