⁠ 
शनिवार, मे 18, 2024

खुशखबर! या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण ; आताचे भाव तपासून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२४ । सोने आणि चांदीने या आठवड्यात आणि मे महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांना मोठा दिलासा दिला. मागच्या चार पाच दिवसापासून काही प्रमाणात सोन्यासह चांदीच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे अक्षय तृतीया सणाला सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Jalgaon Gold Silver Rate

एप्रिल महिन्यात झपाट्याने भाववाढ झालेल्या सोने-चांदीचे भाव आता हळूहळू कमी होत आहेत. जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या चार दिवसात सोन्याचे दर १००० रुपयांनी घसरले आहे. तर चांदीचेही भाव ८०० रुपयांनी कमी झाले. मागणी कमी झाल्याने सोने-चांदीचे भाव कमी झाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे

जळगावात आता व किती?
जळगावच्या सुवर्णनगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ६५,५६० रुपयावर तर २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ७१,६०० रुपयांवर आला आहे. दुसरीकडे चांदीचा दर ८१,००० रुपये प्रति किलोवर आले आहे. यापूर्वी या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दर ७२६०० रुपयांवर होता तर चांदीचा दर तर चांदी ८१ हजार ८०० रुपये प्रति किलो होती. मागणी कमी झाल्याने सोने-चांदीचे भाव कमी झाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे

दरम्यान, येत्या १० तारखेला अक्षय तृतीया सण असून या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यातच सध्या दोन्ही धातूंचे दर घसरताना दिसत असून यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.