तुम्हीही ‘या’ ब्रँडचे शाम्पू वापरताय? तर सावधान.. होऊ शकतो कॅन्सर, कंपनीने परत मागवली सर्व उत्पादनं

ऑक्टोबर 26, 2022 10:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । जर तुम्ही ड्राय शॅम्पूचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण जागतिक FMCG दिग्गज युनिलिव्हर (Unilever) या सुप्रसिद्ध कंपनीच्या अनेक ब्रँडच्या शाम्पूमध्ये कॅन्सर निर्माण करणारे रसायन सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. या कंपनीने डाई शॅम्पूचे काही लोकप्रिय ब्रँड परत मागवले आहेत. त्यांच्यात बेंझिनशी संबंधित दूषित घटक आढळून आले. यामुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ब्रँड परत मागवले आहेत.

dove shampoo jpg webp

डोव्ह-ट्रेसेमसह हे ब्रँड परत मागवले गेले
युनिलिव्हरने ज्या ब्रँडचे ड्राय शैम्पू परत मागवले आहेत त्यामध्ये डोव्ह आणि ट्रेसेमचे ड्राय शैम्पू समाविष्ट आहेत. याशिवाय, इतर ब्रँड ज्यांचे डाई शॅम्पू परत मागवले गेले आहेत ते Nexus, Suave आणि Tiggy आहेत. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या नोटीसनुसार, ते रॉकाहोलिक आणि बेड हेड ड्राय शैम्पू आहेत.

का आहे कर्करोगाचा धोका?

बेंझिनमुळे मानवांमध्ये कर्करोग होऊ शकतो. एफडीएने आपल्या रिकॉल नोटीसमध्ये म्हटले आहे की बेंझिन मानवी शरीरात अनेक प्रकारे प्रवेश करू शकते. तो वासाने, तोंडातून आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे रक्ताचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. FDA ने दिलेल्या माहितीनुसार लोकांनी अशा उत्पादनांचा वापर करणे थांबवावे आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी UnileverRecall.com च्या वेबसाइटला भेट द्यावी. युनिलिव्हरने अद्याप यावर कुठलेही भाष्य केलेले नाही.

अहवालानुसार, प्रामुख्याने ऑक्टोबर 2021 पूर्वी उत्पादित उत्पादने परत मागवण्यात आली आहेत. परंतु या हालचालीमुळे वैयक्तिक स्वच्छता उत्पादनांमध्ये एरोसोलच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.

ही उत्पादनेही मागे घेण्यात आली
विशेष म्हणजे, जॉन्सन अँड जॉन्सन मधील न्युट्रोजेना, एजवेल पर्सनल केअर कंपनीची बनाना बोट आणि बियर्सडॉर्फ एजी मधील कॉपरटोन यांसारखी इतर अनेक उत्पादने गेल्या 18 महिन्यांत परत मागवण्यात आली आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now