अज्ञात चोरट्यांनी केली ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी

नोव्हेंबर 24, 2021 3:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ ।  सिंधी कॉलनी परिसरात उभ्या ट्रॅक्टरचे ८ हजार रूपये किंमतीची बॅटरी चोरीस गेल्याची घटना २० रोजी उघडकीला आली. याप्रकरणी ट्रॅक्टर मालकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल आहे.

सविस्तर असे की, दिलीप शिवप्रकाश चांगरे (वय- ६०) हे नवल कॉलनी शिंधी कॉलनी शेजारी, जळगाव इथं आपल्या कुटुंबीयांसह राहतात. चांगरे हे शेती काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे शेतीसाठी ट्रॅक्टर आहे. दरम्यान १९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर त्यांनी घरासमोर ट्रक्टर पार्किंग करून लावले होते. अज्ञात चोरट्यांनी ८ हजार रुपये किंमतीची ट्रॅक्टरची एक्साइड कंपनीची बॅटरी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

याप्रकरणी दिलीप चांगरी यांनी मंगळवार, दि.२३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक इम्रान सय्यद करीत आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now