जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव रेल्वे स्थानक परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटू शकली नसल्याने, रेल्वे पोलिस चौकीने नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव रेल्वे स्टेशन येथे नवीन जिन्याखाली ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एक पुरुष भाजारी अवस्थेत आढळून आला. स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. या तरुणाला तातडीने औषधोपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले; परंतु तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. अद्याप तरुणाची ओळख पटलेली नसून, ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सचिन भावसार हे करत आहेत. मृताचे वय २८ वर्षे असून, शरीर बांधा सडपातळ आहे. रंग सावळा तर अंगात आकाशी चौकटी रंगाचे मळकट शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पँट असे तरुणाचे वर्णन आहे. मृत तरुणाविषयी कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.











