⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | दुर्दैवी : चिमुकल्यासह आईने गळफास घेत संपविले जीवन

दुर्दैवी : चिमुकल्यासह आईने गळफास घेत संपविले जीवन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । आपल्या पाच वर्षीय चिमुकल्यासह आईने गळफास गेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील शिरुड येथे आज सकाळी उघडीस आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, संबंधित महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे समजते. याबाबत येथील अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पूर्वी सोनवणे असे विवाहितेचे तर वृषांत असे चिमुकल्याने नाव आहे. अमळनेर तालुक्यातील‍ शिरूड येथील माहेर असलेल्या पुर्वी सोनवणे याचे कौटुंबिक वाद असल्याने त्या मुलगा वृषांत यांच्यासोबत माहेरी शिरूड येथे आईवडीलांकडे वास्तव्याला होत्या. दरम्यान मध्यरात्री त्यांनी मुलाला गळफास देवून स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली. दि. १७ जून रोजी सकाळी पुर्वी सोनवणे यांचे वडील वसंत पाटील हे वरच्या मजल्यावर गेले असता मुलीने मुलासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीसह नातवाचा मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व ग्रामस्थांनी धाव घेतली होती. महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे समजते.

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. पूर्वी सोनवणे यांचे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. परंतु, कौटुंबिक वाद असल्याने त्या मुलगा वृषांत यांच्यासोबत माहेरी शिरूड येथे आईवडीलांकडे वास्तव्याला होत्या.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह