⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

दुर्दैवी : वीज कोसळून गायीसह गोऱ्हा जागीच ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक भागाला चांगला फटका बसला असून ठीक ठिकाणी दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत. पाचोरा तालुक्यातील चिंचपूरा शेत शिवारात देखील वीज कोसळल्याने गाय व गोऱ्हा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना २२ रोजी सायंकाळी घडली आहे. दरम्यान, पहिल्याच पावसात ग्रामीण भागात शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील चिंचपूरा परिसरात बुधवारी दि. २२ जुन रोजी संध्याकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून चिंचपुरे येथील शेतकरी वेडुबा ओंकार पाटील यांच्या शेतात एक गायीचा व एक गोऱ्ह्याचा मृत्यू झाला. संध्याकाळच्या वेळी जोरदार वादळ सुरू झाले. पावसाचा अंदाज विजांचा कडकडाट झाला. यावेळी विज अंगावर पडून गायीचा व गोऱ्ह्याचा जागीच मृत्यू झाला. विजेचा आवाज एवढा भयानक होता की, परिसरातील जनावरे व शेतात काम करणारे शेतकरी धास्तावले होते. या घटनेत परिसरात मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीची भरपाई शासनाकडून मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी यांनी केली आहे.

जिल्ह्यात पुढील चार‎ दिवसात तुरळक ठिकाणी मुसळधार‎ पाऊस..
जून संपण्यासाठी केवळ एक आठवडा शिल्लक असून, अजूनही जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाने पाठ फिरवली आहे. मागील दोन तीन दिवसापासून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग आला असून काही ठिकाणी पेरण्या रखडलया आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुढील चार‎ दिवसात तुरळक ठिकाणी मुसळधार‎ पाऊस हाेवू शकताे असा हवामान‎ विभागाचा अंदाज आहे तर संपुर्ण‎ उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस‎ दमदार पाऊस हाेण्याची शक्यता‎ आहे.‎

मान्सून दाखल झाल्यानंतर सुमारे दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. जळगाव‎ जिल्ह्याभरात प्रतीक्षा असलेल्या मान्सूनचे मंगळवार आणि बुधवारी आगमन झाले. पूर्वेकडील‎ भुसावळ, मुक्ताईनगर, बाेदवड तर ‎ ‎ पश्चिमेकडील अमळनेर,‎ धरणगाव, भडगाव या तालुक्यात ‎ ‎पावसाने दमदार हजेरी लावली.

काल बुधवारी जळगाव शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात बुधवारी ९.५ मिलिमीटर‎ इतका सरासरी पाऊस झाला.‎ मान्सूनचे आगमन हाेवून‎ आठवडा उलटूनदेखील पावसाचा‎ जाेर नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पुरेशी ओल ‎नसल्याने शेतकरी पेरणी करू‎ शकले नाहीत. दरम्यान,‎ रविवारपासून पुन्हा पावसाला प्रारंभ ‎झाला असून मंगळवार आणि‎ बुधवारी पावसाने हजेरी लावली. ‎

या वर्षी जून महिन्यात पर्जन्यमान‎ अत्यंत कमी असून २२ जूनपर्यंत या‎ महिन्यातील सरासरीच्या अवघा‎ ५०.७ टक्के पाऊस झाला आहे.‎ जिल्ह्यात ४६ मिमी पाऊस झाला.‎ २२ जूनपर्यंत सरासरी ९०.७ मिमी‎ पाऊस हाेणे अपेक्षीत असते.‎ प्रत्यक्षात ४६ मिमी पाऊस झाला‎ आहे. पिकांसाठी आणखी दमदार‎ पावसाची अपेक्षा आहे.‎ दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुढील चार‎ दिवसात तुरळक ठिकाणी मुसळधार‎ पाऊस हाेवू शकताे असा हवामान‎ विभागाचा अंदाज आहे तर संपुर्ण‎ उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस‎ दमदार पाऊस हाेण्याची शक्यता‎ आहे.‎