---Advertisement---
जामनेर

दुर्दैवी : बालक गणेश विसर्जन करताना पाण्यात बुडाला, गणेशभक्त तरुणाने उडी घेऊन बालकाचे प्राण वाचविले, मात्र..

---Advertisement---

Jamner News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । जामनेरातील गणेशभक्त तरुणाचा बालकाला वाचवताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी घडली. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

jamner 2

किशोर राजू माळी (30) असे मयत युवकाचे नाव आहे. कांग नदी पात्राच्या पुलावर गणपती विसर्जनासाठी आलेला एक लहान मुलगा बुडत असल्याचे पाहून गणेशवाडीच्या किशोर माळी या तरुणाने उडी घेऊन त्या मुलाचे प्राण वाचविले खरे मात्र किशोरचा बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला. किशोर या तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, लहान भाऊ असा परीवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माळी परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश विसर्जनाला घडलेल्या या दुर्दैवी घटनेने जामनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---