⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | दुर्दैवी : खडकीचा बालक गणेश विसर्जनासाठी गेला, मात्र..

दुर्दैवी : खडकीचा बालक गणेश विसर्जनासाठी गेला, मात्र..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

chalisgaon news-जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । जामनेरच्या तरुणाचा बुडणार्‍या बालकाला जीवदान देताना मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक येथे १७ वर्षीय बालकाचा श्री विसर्जनादरम्यान डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सौरव शत्रुघ्न मोरे (वय 17) असे मयत बालकाचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावातील सौरव शत्रुघ्न मोरे (17) हा श्री विसर्जनासाठी तीन मित्रांसोबत अंबुजा कंपनीच्या मागे असलेल्या डोहात गेला होता असता त्याने पाण्यात उडी घेतली. यावेळी सोबत असलेले दोन मित्र डोहाच्या बाहेर उभे होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सौरव मोरेचा पाण्यात बुडू लागला तर दोन्ही मित्रांनी आरडाओरड केली. यावेळी खदानीच्या बाजूला काम करणार्‍या कामगारांनी धाव घेत सौरवला बाहेर काढले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. सौरवच्या पश्चात आई कल्पनाबाई, भाऊ भूषण असा परीवार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह