दुर्दैवी : वीज कोसळल्याने आठ मेंढ्या व दोन बकर्‍या ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२३ । जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे शेतात झाडावर वीज कोसळली. या घटनेमुळे आठ मेंढ्या आणि दोन बकर्‍या जागीच ठार झाल्या आहेत. शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे एका शेतामध्ये नाशिक येथील मेंढपाळ बसलेले आहेत. दरम्यान, शुक्रवारी मेंढ्या झाडाखाली होत्या. दुपारी वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस पडला. यावेळी शेतामधील लिंबाच्या झाडावर वीज पडल्यामुळे दहा मेंढ्या व दोन बकर्‍या मृत्यूमुखी पडल्या असून एक लाख वीस हजाराचे नुकसान झाले.

या घटनेमध्ये मेंढपाळाच्या परिवार सुदैवाने बचावला आहे या घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामा करून तात्काळ त्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी होत आहे.