दुर्दैवी : ३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू

ऑक्टोबर 28, 2022 12:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । तालुक्यातील न्हावी येथील शेत शिवारातील विहिरीजवळ व्हरंडीवर बसलेल्या तरुणाचा तोल जाऊन विहिरीत कोसळून मृत्यू झाला. मयत तरूणाचा मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आला तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

death 1 jpg webp


न्हावी ता.यावल येथील रहिवाशी भरत पांडुरंग बोरोले वय ३४ हा तरूण गावालगत असलेल्या नामदेव फिरके यांच्या शेत विहिरीच्या व्हरंडीवर बसला होता. त्या ठिकाणी बसला असतांना अचानक त्याचा तोल गेला व तो विहिरीत कोसळला व पाण्यात बुडून बेपत्ता झाला सदर घटना निदर्शनास येतात नागरिकांनी विहिरीत शोध मोहीम राबवली व त्याचा मृतदेह विहिरीतून काढून यावल रुग्णालयात आणला येथे डॉ. सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now