दुर्दैवी : इलेक्ट्रीक शॉक लागल्याने २७ वर्षीय महिलेचा मृत्यू

जुलै 7, 2022 12:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील २७ वर्षीय महिलेचा इलेक्ट्रीक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पहूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

jamner 1 jpg webp

सपना श्याम जोशी (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. या महिला तालुक्यातील शेंगोळा येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. बुधवारी रोजी त्यांना इलेक्ट्रीक शॉक लागल्यामुळे त्यांचा जागीच झाला. दरम्यान, त्यांच्यावर पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्ट मोटर्म करण्यात आला. याबाबत पहूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास किरण शिंपी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now