⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

स्टार्टअप्समुळे देशातील बेरोजगारीचा दर घटणार : डॉ. युवराज परदेशी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । देशातील प्रमुख समस्यांपैकी एक म्हणजे दिवसेंदिवस वाढणारे बेरोजगारीचे प्रमाण. ही समस्या कमी होण्यासाठी देशात स्टार्टअप कल्चर वाढण्याची आवश्यकता आहे. स्टार्टअप ही संकल्पना आता केवळ मोठ्या शहरांची मक्तेदारी राहील नसून छोट्या शहरांसह ग्रामीण भागातही पुढे येत आहे. देशात स्टार्टअपची संख्या वाढली तर बेरोजगारीचा दर निश्‍चितपणे कमी होईल, असा विश्‍वास जळगाव लाईव्हचे डॉ.युवराज परदेशी यांनी व्यक्त केला. विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात युथ आणि स्टार्टअप या विषयांवर व्याख्यान पार पडले. यावेळी ते बोलत होते.

जागतिक युवा दिन आणि ग्रंथपाल दिनानिमित्त युथ आणि स्टार्टअप विषयांवर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. युवराज परदेशी यांनी स्टार्ट अप म्हणजे काय? स्टार्टअप कोण करू शकतो? स्टार्टअपची वैशिष्टे काय ? स्टार्ट आपण आणि बिझनेस मधील फरक काय? आणि कोणकोणत्या क्षेत्रात स्टार्टअप च्या संधी उपलब्ध आहे. यासह शालेय व महाविद्यालयीन स्तरापासून स्टार्टअप बद्दल विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्णाण करण्यासाठी काय केले पाहिजे, यावर मार्गदर्शन केले.

तसेच स्टार्टअप व्दारे मोलाची कामगिरी करणार्‍या संस्थेची माहिती देत विद्यार्थ्यांनी नवनवीन योजनेतून चांगल्या स्टार्टअपची उभारणी करून आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किशोर पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशा पाटील यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. वैजयंती चौधरी यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे समन्वयक उमेश इंगळे, ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी, डॉ. संतोष बडगुजर, डॉ. वैजयंती चौधरी, आशा पाटील, कल्पना पाटील, हितेंद्र सरोदे, मुरलीधर चौधरी, सुनील बारी, यांनी परिश्रम केले.