बायोकेमिकल ऑईल देण्याच्या बहाण्याने १६लाखात गंडविले!

ऑगस्ट 29, 2022 11:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । बायोकेमिकल ऑईलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपनीच्या आलेल्या दोन जणांच्या बंक खात्यावर १६लाख रुपये टाकून आईल न दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत दोन जणांविरूध्द भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 11T112628.555

हॉटेल व्यावसायीक सारंगधर महादेव पाटील उर्फ छोटू ढाबेवाले यांना बायोकेमीला आईलचा व्यवसाय सुरू करायचा होता, त्यामुळे त्यांनी सरत येथून आलेल्या कंपनीच्या हिरेन तोमर व राकेश (पूर्ण नाव माहिती नाही) दोन एजंट यांच्याशी चर्चा केली. पाटील यांनी दोन्ही एजंट यांना 20 लाख रुपयांच्या ऑईलची ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यावर 160 लाख रूपये पाटील यांनी या दोन्ही जणांच्या व्यक्तीगत बँक खात्यावर टाकले. ही घटना 3 डिसेंबर 2021 या दिवशी घडली.

हॉटेल व्यावसायीक पाटील यांनी संशयीतांच्या बँक खात्यावर 16 लाख रुपये टाकल्यावर त्यांना वारंवार मालाची मागणी केली, त्यांना गाडी निघाली आहे, गाडी खराब झाली आहे, उद्या माल पाठवितो, असे उत्तर मिळत होती. त्यांनी शेवटी पैसे परत करावे, असे सांगितले. ऑईल देऊ नका मात्र माझे पैसे परत करा, असे सूचित केले. गेल्या वर्षभरापासून दोन्ही संशयीातांशी त्यांचे बोलणे सुरू होते, मात्र माल काही पाठविला जात नव्हता. या प्रकरणी पाटील यांनी लेखी करार केला होता, मात्र कराराचा दोन्ही जणांनी भंग केल्याने सारंगधर पाटील यांनी शनिवारी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिल्याने हिरेन तोमर व राकेश यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आहे. तपास हवालदार गोपाळ गव्हाळे पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now