Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील अंजाळे शिवारातुन अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे डंपर काल बुधवारी, दि. ७ रोजी महसूल पथकाने पकडले. यात सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या करावाईमुळे अवैध गौण खनिजची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील अंजाळे शिवारात स्टोन क्रशर चालक, मालक हे तापी नदी किनारपट्टीवर गौण खनिजाचे आपल्या सोयीनुसार आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात उत्खनन करून नाममात्र रॉयल्टी भरून गौण खनिजाची सर्रासपणे अनधिकृत, बिना परवाना वाहतूक करून गौण खनिज विक्री करून शासनाचा दर महिन्याला लाखो रुपयांचा महसूल बुडवीत असल्याचे महसूल विभागाच्या लक्षात आल्याने बुधवार दि. 7 सात रोजी दुपारी अंजाळे शिवारात कारवाई केली. दरम्यान, दोन डंपर खडकाने म्हणजे गौण खनिज आणि अनधिकृत वाहतूक करीत असताना आढळून आले.
दरम्यान, मंडळ अधिकाऱ्यांनी दोन्ही डंपर ताब्यात घेऊन यावल तहसील कार्यालयात जमा केले पुढील कारवाई प्रांताधिकारी कैलास कडलग हे करणार असल्याचे समजते. बामणोद मंडळ अधिकारी बबीता चौधरी, भालोद मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी,तलाठी समीर तडवी, साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यासह या चारही मंडळातील तलाठी यांनी कारवाई केली.
दरम्यान, अंजाळे शिवारात आर्थिक वर्षात तापी नदी किनारपट्टीवर स्टोन क्रशर मालकांनी आता पर्यंत गौण खनिज किती ब्रास उत्खनन केले ? आणि स्टोन क्रशर मालकांनी प्रत्यक्ष किती ब्रास गौण खनिजाची रॉयल्टी भरली? आणि अंजाळे शिवारातून जळगाव जिल्ह्यात गौण खनिज किती किती ब्रास अवैध अनधिकृत बिना परवानगी वाहतूक करण्यात आली याबाबतची चौकशी करून प्रत्यक्ष पंचनामे केल्यास अवैध गौण खनिजाचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही तसेच शासकीय महसुलात 75 टक्के वाढ झाल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा बोलले जात आहे.