बुधवार, ऑक्टोबर 4, 2023

उधना-पाळधी मेमू आता भुसावळपर्यंत धावणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२३ । कोरोना लॉकडाऊन पासून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरु झालेल्या नाहीय. त्याऐवजी मेमू आणि एक्सप्रेसच्या स्वरूपात या गाड्या चालविल्यास जात असून प्रवाशांना यामुळे अधिकचा भूर्दंड बसत आहे. सोबतच काही पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांच्या वेळेतही बदल असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, पश्चिम मार्गावर सुरु असलेली उधना पाळधी मेमू आता भुसावळपर्यँत धावणार आहे

या मेमूला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे १५ रोजी दोंडाईचा रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखविणार असल्याची माहिती आमदार जयकुमार रावल यांनी दिली. मात्र रेल्वे प्रशासनाने याबाबतचे आदेश मिळाले नसल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना लॉकडाऊन आधी भुसावळहुन सकाळी आणि सायंकाळी थेट सुरतला जाण्यासाठी पॅसेंजर धावत होती. सध्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेस मध्ये करण्यात आले आहे. त्यातही सध्या सकाळची ही गाडी नंदुरबारपर्यंत धावत आहे. तर सायंकाळी दोन गाड्या सुरत पर्यंत धावतात. दुसरीकडे सुरतहुन भुसावळ धावणारी सकाळची गाडी देखील बंद आहे. त्यात उधना-पाळधी मेमू ही पाळधीपर्यंतच धावत आहे. अशात जर उधना-पाळधी मेमू आता भुसावळपर्यंत धावू लागली तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल