---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांकडे मैत्रीचा प्रस्ताव, गिरीश महाजन म्हणतात..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून आज अग्रलेखाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मैत्रीचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

udhav thakre fadanvis girish mahajan jpg webp

काय म्हणाले महाजन?
युती संदर्भात कुठल्याही प्रकारचा विचार नसून सध्या जे शब्दाचे बाण एकमेकांवर चालवले जात आहेत. त्यामुळे राजकीय प्रतिमा मलिन होत आहे. हे शब्दांचे चालवले जाणारे बाण थांबविण्यासाठी सामनातून मांडण्यात आलेला प्रस्ताव स्वागतार्हय असल्याचे महाजन म्हणाले. दरम्यान, यावेळी राज्यातून पुन्हा एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना विचारणा केली असता या प्रश्नाला मंत्री गिरीश महाजन यांनी बगल दिली. या प्रश्नावर उत्तर देण मंत्री गिरीश महाजन यांनी टाळले आहे.

---Advertisement---

दरम्यान, मागील काही दिवसापासून शिंदे सरकारचे समर्थक असलेले आमदार बच्चू कडू आणि आ. रवी राणा यांच्यातील वाद उफाळून निघाला आहे. या वादावर देखील बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी रवी राणा यांच्याशी काही वेळापूर्वीच फोनवरून संवाद साधला. असे सांगत, बच्चू कडू यांच्याशी देखील हा वाद मिटवण्यासंदर्भात आमचे बोलणे सुरू असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवार मंगळवार पर्यंत रवी राणा व बच्चू कडू यांना एकत्र बसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा वाद मिटवतील असे स्पष्ट केले आहे.

वैद्यकीय शिक्षण हे मराठी भाषेतून सुरू करण्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिश भाषेमधून शिक्षण घेताना मोठ्या अडचणी येतात. त्या अडचणी दूर करण्यासाठीच हा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. मंत्री महाजन यांनी केंद्र सरकारतर्फे प्रत्येक राज्यांमध्ये त्या त्या भाषेतून तेथील शिक्षण देण्यात यावे; असा निर्णय घेण्यात आला असल्याने आम्ही हा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---