उद्धव साहेब शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदें सोबत चला : सर्व शिवसेना खासदारांची मागणी

जुलै 11, 2022 7:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । राजकारणात शिवसेनेला टिकून राहायचं असेल आणि अधिक अधिक जागा शिवसेनेच्या पदरात पाडून घ्यायच्या असतील तर भारतीय जनता पक्षासोबतच जाऊन युती केलेली बरी अशी मागणी शिवसेना खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी शिवसेना खासदार उद्धव ठाकरे यांना म्हणाले की, जास्तीत जास्त खासदार जर लोकसभेवर निवडून आणायचे असतील तर एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेणे हेच शिवसेनेच्या हिताचे आहे.

uddhav thakre 4 jpg webp

शिवसेनेच्या चाळीस आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात जातात की काय ? असा प्रश्न उद्भवू लागला आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला दहा खासदारांनी दांडी मारली. यामुळे आता लोकसभेतही शिवसेना खिळखिळी होते की काय? असा प्रश्न विचारला जात असतानाच उपस्थित शिवसेना खासदार यांनी आपण भाजपसोबत जाऊन शिंदे यांचे ऐकून भाजप सोबत युती केली पाहिजे असे म्हटले आहे,

शिवसेनेच्या बैठकीला खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, धर्यशील माने, हेमंत गोडसे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे, ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. तर दुसरीकडे खासदार भावना गवळी, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, संजय जाधव, राजेंद्र गावित, कृपाल तुमाने, संजय मंडलिक,कलाबेन डेलकर, हेमंत पाटील हे अनुपस्थित होते. राज्यसभा खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी देखील बैठकीला उपस्थित होत्या.

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी खासदारांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शिवसेनेचे तब्बल दहा खासदार हे अनुपस्थित होते मात्र उपस्थित असलेल्या खासदारांनीही आपण भारतीय जनता पक्षासोबतच युती केलेली बरी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली

शिवसेनेतील चाळीस आमदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार बसल आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. शिवसेनेचे खासदार शिंदे गटात असल्याचे दावा गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यानंतर भाजपासोबत जायला हवं असे मत खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केलं होतं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवाराला आपण मतदान करावं अशी मागणी शिवसेनेच्या काही खासदारांनी केली होती. यात आज झालेल्या बैठकीत सर्व शिवसेना खासदार भाजपसोबत जायला उत्सुक आहेत असे दिसले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now