⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

उदयपुर घटनेचा एरंडोलात तेली समाजातर्फे निषेध

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । उदयपुर येथील कन्हैय्याकुमार साहू यांची अत्यंत क्रूर पद्धतीने गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेचा देशभरातील तेली समाजबांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आज गुरुवारी रोजी एरंडोल तालुका तेली समाजाच्यावतीने देखील निषेध करण्यात आला, हत्याकांडातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत प्रांताधिकारी विनय गोसावी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान या मागण्या पूर्ण न झाल्यास समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

उदयपुर येथील हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच पिडीत कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याना त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे. कन्हैयाकुमार साहू यांच्या परिवारास त्वरित शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी आणि त्याच्या परिवाराची पालनपोषणाची जबाबदारी शासनाने स्वीकारावी. असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष गुलाब चौधरी, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील चौधरी, युवक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस संजय चौधरी शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र चौधरी, शहराध्यक्ष रवींद्र निंबा चौधरी, सचिव आर.डी.चौधरी, समाधान चौधरी, सुनील चौधरी, राकेश चौधरी, अरुण चौधरी, गोरख चौधरी, शंकर चौधरी, चंद्रकांत चौधरी, अनिल चौधरी, प्रा.मनोज पाटील, माजी नगरसेवक बबलू चौधरी, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य आनंदा चौधरी (भगत), बापू चौधरी, प्रविण चौधरी, प्रमोद चौधरी, शरद चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, डॉ राजेंद्र चौधरी, छबुलाल चौधरी आडगाव, भास्कर चौधरी कासोदा, नारायण चौधरी, उत्राण, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, भास्कर चौधरी, प्रकाश चौधरी, मनोज चौधरी, दिलीप चौधरी, छोटू चौधरी आदी उपस्थित होते.