गुन्हेजळगाव जिल्हा

जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२५ । जळगाव शहरात आणखी एका अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात सिमेंटने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी दुपारी ममुराबाद रस्त्यावरील मितवा हॉटेलजवळ घडली. विलास रामसिंग भिल (वय ४० रा. ममुराबाद) असे अपघातातील मृताचे नाव असून जळगाव शहरातील ही घटना दुसरी असल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत असे की, ममुराबाद(ता. जळगाव) मध्ये कुटुंबियांसह वास्तव्याला असलेले विलास भील हे ऊस तोडण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान आज गुरुवारी विलास हे दुचाकी (एमएच १० एआय ०३८१) ने जळगाव शहरातून ममुराबाद येथे घरी येत असतांना ममुराबाद रस्त्यावरील हॉटेल मितवा जवळून जात असतांना रोडवर समोरून सिमेंटने भरलेले ट्रॅक्टकर क्रमांक (एमएच १९ पीआय ३३७५) ने जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीस्वार विलास भिल हा जागीच ठार झाला. ही घटना घडल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेहाचा पंचानामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button