दोचाकी चोरणारा अट्टल चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२३ । एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या बांधत त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीने घरफोडीची देखील कबुली दिली आहे. इश्तीयाक अली राजीक अली (20, रा. तांबापुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

कारागृहातून घेतले ताब्यात
तांबापुर्‍यात सादीन शब्बीर पटेल यांच्याकडे आरोपीने 50 हजारांची घरफोडी केली होती. 2 फेब्रुवारी रोजी घडलेल्या घरफोडीप्रकरणी आरोपी इश्तीयाकला अटक करण्यात आल्यानंतर रोकड जप्त करून आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली मात्र आरोपीने खेडी रोड परीसरातून चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास न्यायालयाच्या परवानीने कारागृहातून ताब्यात घेत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपीला गुरुवार. 9 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास सोमवार, 13 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे , किशोर पाटील, इमरान सय्यद, सुधीर साळवे, सचिन पाटील, योगेश बारी, किरण पाटील, मुकेश पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.