जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. यातच दुचाकी चोरुन त्याची विल्हेवाट लावणाऱ्या एकाला एलसीबीच्या पथकाने अटक केलीय. गोपाल श्रावण तेली (वय ४२, रा. कळमसरा, ता. पाचोरा) असे या दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
जळगाव शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली दुचाकी गोपाल तेली हा संशयित वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकातील पोहेकॉ गजानन देशमुख, विनोद पाटील, विष्णू बिऱ्हाडे, ईश्वर पाटील, राहूल महाजन या कर्मचाऱ्यांनी संशयित गोपाल तेली याला ताब्यात घेतले.
त्याची कसून चौकशी केली असता, या दुचाकीसह आणखी तीन दुचाकी आपल्या साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार शहर, जिल्हापेठसह भुसावळ बाजारपेठ व चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. पुढील चौकशीसाठी संशयित गोपाल तेली याला शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.