⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । नशिराबाद कडून जळगाव कडे येत असलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध जखमी झाल्याची घटना दि १८ रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात कारचाकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, नशिराबाद येथील बारदरी मोहल्ला जवळील रहिवासी सुलतान शेख उस्मान (वय-६०) हे १७ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्या (एमएच १९ बीडी ४८७१) या क्रमांकाच्या दुचाकीने नशिराबादकडून जळगावकडे जात होते. यादरम्यान महामार्गावर (एमएच ०५ सीए १६५२) या क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील सुलतान शेख यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी सुलतान शेख यांचा नातू शेख जावेद शेख आसिफ याने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात कारचालक विरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.