⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मुलगी दवाखान्यात बाहेर चोरट्यांनी लांबवली दुचाकी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ असलेल्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या मुलीला पाहण्यासाठी वडील आले असता त्यांनी बाहेर दुचाकी लावलेली होती. संधी साधत अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी दुचाकी लंपास केली.
शहरातील शिरसोली येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर शिवाजी पाटील हे जैन इरिगेशनमध्ये कामाला आहेत. त्यांची मुलगी मयुरी वय-११ हिची तब्येत बरी नसल्याने तिला इच्छादेवी चौफुलीजवळील सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. दि.८ रोजी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील यांनी स्वतःची दुचाकी क्रमांक एमएच.१९.सीजी.१५१९ हि हॉस्पिटलबाहेर लावली आणि ते मुलीला भेटण्यासाठी गेले. ७.१५ वाजेच्या सुमारास ते बाहेर आले असता त्यांना स्वतःची दुचाकी जागेवर दिसून आली नाही.

ज्ञानेश्वर पाटील यांनी परिसरात शोध घेतल्यावर दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून चोरटे मात्र पोलिसांच्या हाती लागत नाही