⁠ 
सोमवार, मे 27, 2024

रास्ता अडवून मारहाण करत पैशाची बॅग हिसकावून झाले पसार ; जळगावातील धक्कादायक प्रकार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यात रस्ते लुटमारीच्या वाढताना दिसत आहे. अशातच जळगावातील शिवाजी नगरात परिसरातून दोन मित्र दुचाकीने जात असताना त्यांचा रास्ता अडवून मारहाण करत लुटल्याची घटना घडली. त्यांच्याजवळील बॅग हिसकावून त्यातील पैसे काढून बॅग नाल्यात फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गेंदालाल मिल परिसरातील तौसिफ सईद शेख (वय २३) हा तरूण २३ एप्रिलला रात्री ९ वाजेच्या सुमारास मित्र अरबाज शेख याच्यासोबत दुचाकीने शिवाजी नगरात परिसरातून जात होता. त्या ठिकाणी पाठीमागून दुचाकीने आलेल्या तीन जणांनी तौसिफची दुचाकी अडविली. यानंतर तिघांनी तौसिफ आणि अरबाज यांना मारहाण केली. तसेच तौसिफजवळ असलेली बॅग जबरी हिसकावून नेत बॅगेतील पैसे काढून ती बॅग जवळच्या नाल्यात फेकून दिली.

सदरची घटना घडल्यानंतर तौसिफ सईद शेख यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश आनंदा कोळी (वय २४) याला अटक केली. तर त्याचे दोन्ही साथीदार हे फरार झाले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा ह्या करीत आहे.