---Advertisement---
गुन्हे महाराष्ट्र

भयंकर! जन्मदात्या आईनेच झोपेतच दोन चिमुकल्यांना संपविले

daund news
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२५ । पुण्यातील (Pune) दौंडमधून (Daund) एक भयंकर घटना समोर आलीय. ज्यात जन्मदात्या आईनेच दोन चिमुकल्यांचा झोपेतच गळा दाबून हत्या केली. आरोपी महिलेकडून पतीवर देखील कोयत्याने वार करून जखमी केले. शंभू दुर्योधन मिढे (वय ०१ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे (वय ०३ वर्ष) अशी मयत मुलांची नावे असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या.

daund news

ही घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमध्ये घडली. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे वय 35 वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केलं आहे. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

---Advertisement---

आज पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---