गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

जून 18, 2026 5:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाऊंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगाव येथील संगणक अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिनी मृणाली सपकाळे आणि गणेशराज पाटील यांची परिसर मुलाखतीतून निवड झाली आहे.

mrunalai sapkale ganesh patil

मृणाली सपकाळे हीची आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॉग्निझंटमध्ये तर गणेशराज पाटील यांची क्सेंचर मध्ये निवड झाली आहे. दोघांनी सातत्यपूर्ण मेहनतीच्या, तांत्रिक कौशल्यांच्या आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी केली आहे. महाविद्यालयातील प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या मार्गदर्शनाखाली तिने विविध तांत्रिक व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. याच तयारीच्या बळावर निवड प्रक्रियेत यश मिळविले.

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच रोजगारक्षमतेसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, मॉक इंटरव्ह्यू आणि उद्योग क्षेत्राशी संलग्न उपक्रमांचे आयोजन केले जाते. महाविद्यालयाचा प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून अनेक विद्यार्थी देशातील प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचार्‍यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now