जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वादळासह पावसाच्या सरी कोसळ्या. या दरम्यान, आज दुपारी अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे वादळामुळे खळ्यातील झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोघ बहिणीचा दबल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्योती बारेला (१६) आणि रोशनी बारेला (१०) असे दोघा बहिणींचे नावे आहे.
याबाबत असे की, रणाईचे येथे राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदरकी करण्यासाठी आलेल्या बल्लू बारेला याने गावाबाहेर खळ्यात स्वतःची झोपडी तयार केली होती. आज रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरात वादळ आणि पाऊस सुरू झाला. काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड कोसळले. त्यात बल्लूची झोपडी दाबली गेली. त्याची मोठी मुलगी ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला.
ताबडतोब गावातील सरपंच भगवान बवल पाटील , रंगराव पाटील , गोपाळ मुरलीधर पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ तरुण मदतीला धावून आले. संपूर्ण घर दाबले गेल्याने झाड कापून मुलींना व घरचे समान काढण्याची प्रक्रिया सुरू होती.