जळगाव लाईव्ह न्यूज । २०एप्रिल २०२२ । ग्वाल्हेर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ, राष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंनी प्रत्येकी रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. दोन्ही खेळाडूंनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.
स्पर्धेत विद्यापीठच्या संघाने रौप्यपदक मिळविले. या संघात प्रताप कॉलेजचा वरिष्ठ महाविद्यालयीन खेळाडू विशाल पाटीलने रौप्यपदक मिळवले. याचप्रमाणे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय रग्बी स्पर्धा मुंबई येथे झाली. त्यात विद्यापीठच्या संघाने कांस्य पदक मिळविले. यात प्रताप कॉलेजची खेळाडू पल्लवी पाटीलने राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक मिळवले. या दोन्ही खेळाडूंचे खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, चिटणीस डॉ.ए.बी.जैन, प्र.प्राचार्य डॉ.प्रकाश शिरोडे, डॉ.जयेश गुजराथी, डॉ.जयंत पटवर्धन, जिमखाना प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी कौतुक केले.