पारोळ्यात कार अपघातात दोन जण ठार; दोन जण गंभीर

ऑक्टोबर 18, 2024 12:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२४ । पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विचखेडे गावाच्या अलीकडे धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली जाऊन चार वेळी उलटली. त्यात कार मधील दोघांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

car accident

राहुल भाऊसाहेब अहिरे (वय २८) व निलेश सुरेश पाटील (वय २३) रा. रा. तरवाडे जि. धुळे असे मृतांची नावे आहेत. पारोळा कडून धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारमध्ये निलेश पाटील, गोविंद भास्कर राडोड (वय २४) रा. तरवाडे, राहुल अहिरे हे तिघे व महेश आत्माराम पाटील (वय २१) रा. मोंढाळे प्र. अ. ता. पारोळा हे धुळ्याकडे भरधाव वेगाने जात होते. तेव्हा पारोळा शहरानजीक असलेल्या विचखेडा गावाच्या अलीकडे कार वरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार कार रोडच्या कडेला चार वेळा उलटून खाऊन पाचशे फुटावर थांबली.

त्यात राहुल पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तर निलेश पाटील याला उपचारासाठी धुळे येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. महेश देवरे व गोविंदा वंजारी हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना १०८ रुग्णवाहिका व महामार्गाची १०३३ व नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेत पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गोविंदा राठोड यांनाही धुळे येथे हलवण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now