⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

पावसाचे पुन्हा दोन बळी, वीज पडल्याने दोघांनी गमावला जीव

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मेघ गर्जनासह पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक भागांना चांगलाच फटका बसला आहे. तसेच अनेक भागात दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत. काल सरपण आनण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अंगावर वीज पडल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाऊस सुरु असताना झाडा खालून जात असलेल्या महिलेचा देखील वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात वीज पडून मृत्यू झालेल्यांची संख्या चार पोहचली आहे. याबाबत विविध पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

रावेर तालुक्यातील जानेरीच्या मुक्कडर कलिंदर तडवी (वय २१) या तरुणाचा सरपण आनण्यासाठी गेलेला असताना दरम्यान वादळ वारासह मेघ गर्जना सुरु होऊन अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत सावदा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जयराम खोडपे करत आहे. तर दुसरी घटना ही यावल तालुक्यातील नावरे येथे घडली आहे. रिना सुनील मेंढे (वय ३९) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास संदीप सूर्यवंशी करत आहे.

हे देखील वाचा
Damini App : ”दामिनी’ ॲप” काय आहे आणि ते वीज पडण्यापूर्वी कसे सतर्क करते, जाणून घेणे आहे महत्वाचे

वीजेचा पहिला बळी पाचोरा तालुक्यातील गाळण बु. येथे गेला होता. कैलास बारकु पाटील (वय ४६) असे मृत्यू शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील हे आपल्या शेतीच्या कामात व्यस्त होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट होऊन मोठा आवाज झाला. कैलास पाटील यांच्या शेजारीच विज पडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. दुसरा बळी चोपडा तालुक्यातील जुना नवागाव गडरापाडा येथे गेला होता. पिंटू पावरा (वय ३४) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. पावरा यांच्या अंगावर वीज पडल्याने, नातेवाईकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना डॉक्तरांनी मृत घोषित केले. अडावद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.