भीषण! चोपड्यात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चौघांना चिरडले

मे 20, 2025 4:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची अत्यंत दयनीय अवस्था झालीय. अनेक बसमध्ये ना खिडक्या, ना व्यवस्थित दारं, तर छप्परही अक्षरशः ढासळण्याच्या स्थितीत अनेक बस रस्त्यावर धावताना दिसत आहे. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात शहरातील गजबजलेल्या भागात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. रवींद्र बहारे (वय 40 वर्ष) व सोनू रशीद पठाण (वय 22 वर्ष) अपघातातील मृतांची नावे असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

chopda st bus accident

चोपडा शहरात स्वस्तिक टॉकिज परिसरात एसटी (क्र MH 40, N9828) या बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली. ही बस लासूरकडून चोपडा आगारात येत असल्याची माहिती आहे. मात्र शहरातील गजबजलेल्या भागात भरधाव  ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. यात रवींद्र बहारे आणि सोनू रशीद पठाण हे दोघे ठार झाले.

तर या अपघातात अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून आमदार चंद्रकांत सोनवणे डॉक्टरांना तातडीने उपचाराचे निर्देश दिले. दरम्यान बसने दुचाकीस्वरांना चिरडल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment