मोठी बातमी ! जळगावच्या कारागृहमध्ये दोन गटात तुफान दगडफेक
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरातील जिल्हा कारागृहमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. कारागृहमध्ये बंदिवान असलेल्या दोन गटात तुफान दगडफेक झाली असून यात एक जण गंभीर जखमी तर इतर किरकोळ जखमी झाल्याची घटना समोर आलीय. ही घटना आज शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे
याबाबत असे की, जळगाव जिल्हा कारागृह बॅरिकेट क्रमांक १ ते ४आणि ९ ते १२ येथे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात दाखल असलेले कैदी यांच्यात जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात सुरुवातीला किरकोळ वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर दोन गटात हाणामारी होऊन तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकमध्ये सचिन सोमनाथ गायकवाड (वय 30 रा. सबजेल जळगाव) हा बंदीवान कैदी हे जखमी झाले आहे.
तर इतर किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. हा वाद कोणत्या कारणासाठी झाला याची माहिती अद्यापसमोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह किंवा जिल्हा कारागृहात दाखल झाले आहे.