दोन आयशर समोरासमोर धडकल्या, एकाच जागीच मृत्यू, दोघे गंभीर

डिसेंबर 1, 2021 3:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२१ । दोन भरधाव आयशरच्या अपघातात एक ट्रकचालक जागीच ठार तर दोन जण गंभीर झाले. ही घटना पाचोरा ते भडगाव दरम्यान मंगळवारी रोजी घडली. गंभीर जखमींचे पाचोऱ्यात उपचार सुरु आहे.

apghat 2 jpg webp

सविस्तर असे की, बांबरुड (महादेवाचे) जवळील तितूर नदी पुलाजवळ भुसावळहून मुंबईला केळी घेऊन जाणारी आयशर (क्रं.एम.एच. ४६ ए.आर.३८८८) व भडगावकडून पाचोराकडे येणारी रिकामी आयशर (क्र.एम.एच.२० बी.टी.२२४७) यांची धडक झाली. यात भुसावळहुन मुंबईकडे जाणाऱ्या आयशर चालक इलियास शेख (वय ४६, रा. भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इम्तियाज खान (वय ४३) व शाहरुख सलीम खान (वय २८, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) हे गंभीर जखमी झाले. त्यांचे पाचोऱ्यात उपचार सुरु असून, अपघातग्रस्त दोन्ही आयशरचा  चक्काचूर झाला आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now