गुन्हेमुक्ताईनगर

मुक्ताईनगरजवळ मालवाहू ट्रक उलटला; चालकाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । मालवाहू ट्रकवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव शिवारात घडली. कैलाससिंग प्रेमसिंग यादव (वय ५०) असे मयत चालकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील रहिवासी कैलाससिंग यादव (वय ५०) हे एक ट्रक (क्र. घेऊन आरजे-०९-जीसी-६२३३) मलकापूरहून इंदोरकडे जात होते. २७ रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव शिवारात ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले.

त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन पलटी झाला. या भीषण कैलाससिंग यादव यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत त्यांना ट्रकमधून बाहेर काढले व उपचारासाठी शासकीय रुग्णालय, मुक्ताईनगर येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गोपालकृष्ण राधेश्याम नायक यांनी फिर्याद दिली. अपघातात चालक

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button