जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
शासनाने जाहीर केलेल्या एक दिवसाच्या दुखवट्या मध्ये दोघेही शाळांनी सामील होऊन शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित राहून लता मंगेशकर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर उपशिक्षक योगेश भालेराव यांनी लता दिदीच्या नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे..! या गाण्यातून लता दिदींच्या आठवणींना उजाळा दिला. प्रसंगी शाळेच्या पार्यवेक्षिका प्रणिता झांबरे तसेच सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- किरकोळवादातून दोन गट भिडले
- कांद्याला भाव मिळेना : बेहाल शेतकरी आत्ता करणार अनोखं आंदोलन
- सरपंचपदी सुवर्णा पाटील यांची बिनविरोध निवड
- शाळेच्या पहिल्या दिवशी यंदा दोन शालेय गणवेश
- गिरीश महाजन यांना जामनेर मध्येच अडकवून ठेवा – संजय सावंत
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज